आपल्या मागण्यांसाठी ‘जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती’चे मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जुनी पेंशन मागणीसाठी लोकशाही मार्गाने पेंशन मार्च काढणाऱ्या ‘जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती’च्या आंदोलकाना अटक करून दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ त्यांना जुनी पेंशन लागू करावी या मागणीसाठी ‘जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती’ने मुख्यमंत्री याच्या नावे तहसीलदार यांना निवेदन दिले.

यात “मंगळवार, दिनांक २१ डिसेंबर २०२१ पासून पडघा कल्याण येथून जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने लोकशाही सनदशीर मार्गाने ‘पेंशन मार्च’ काढण्यात आला होता. या आंदोलनाकाची बाजू ऐकून न घेता सरकारने गुरुवार, दि. २४ डिसेंबर रोजी ‘जकात नाका’ येथे पेंशन मार्च अडवून पेंशन मार्च रोखण्याचा प्रयत्न केला आणि ठाणे येथील नवघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट असून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून जुनी पेंशन मागणीसाठी लोकशाही मार्गाने पेंशन मार्च काढणाऱ्या ‘जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती’च्या आंदोलकाना अटक करून दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ त्यांना जुनी पेंशन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना मागणी करित आहोत.” अशा आशयाचे निवेदन ‘जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती’ने तहसीलदार यांना दिले.

या प्रसंगी जुनी पेन्शन संघटना,जळगावचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ गोंडगिरे, जुनी पेन्शन संघटना, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अतुल लोढे, मुक्ताईनगर शिक्षक सेना तालुकाध्यक्ष रोशन साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक मनोज लुल्हे, अनिल पवार, NPS कर्मचारी तथा जुनी पेन्शन संघटना, मुक्ताईनगर तालुका कार्यकारणी सदस्य संतोष धनगर, दिनेश शिर्के, अशोक पाटील, मुकेश जुंबळे, सुभाष मोरे, तहसील कर्मचारी आर.एस.वानखेडे आदींची उपस्थिती होती.

Protected Content