डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय, जळगाव. येथे मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणार्‍या, प्रथम शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक चौधरी संशोधन संचालक, कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ मोनिका भावसार , प्रा. मयुरी देशमुख,व राष्टीय सेवा येजना चे कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी प्रा. पायल दहीवले महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. प्रवीण देवरे व सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ अशोक चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तर, प्रा. मयुरी देशमुख यांनी सावित्रीबाई फुले च्या कार्यविषयी सविस्तरपणे माहिती सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मोनिका भावसार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व संगीतले. सूत्रसंचालन कु प्रगती ढवळे यांनी केले व कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु किमया नादरे यांनी केले.

Protected Content