जळगावात शिक्षिकेची २३ हजाराची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । वर्तमानपत्रातील जाहीरात बघून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत तरूणीला २३ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, भावना राजेंद्र खैरनार (वय-४७) रा. गुड्डूराजा नगर, बीएचआर सोसायटी या गृहीणी आहेत. शहरातील एका वर्तमान पत्रात रिलायन्स जिओ कंपनीची नोकरीची जाहीरात होता. त्यानुसार २७ ऑगस्ट २०२० रोजी महिलेने आपल्या मुलीला नोकरी लागावी यासाठी कॉल करून नोकरीची विचारपूस केली. आणि नोकरीसाठी २ हजार ५० रूपये ऑनलाईन पाठविले. त्याच दिवशी पुन्हा दुसऱ्या मोबाईल नंबरवरून फोन येवून अजून पैसे पाठवा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ८ हजार ६५० आणि १२ हजार ६०० रूपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान अज्ञात व्यक्तीने पुन्हा फोन करून अजून पैसे टाका असे सांगितले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील एपीआय मंगेश पवार करीत आहे.

 

Protected Content