निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारा आयशर पकडला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या मालेगाव रोडवरील शितल मोटर्स जवळून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करतांना आयशर पोलीसांनी पकडला. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

चाळीसगाव शहरापासून जवळ असलेल्या मालेगाव रोडवरील शितल मोटर्स परिसरातून आयशर (एमएच १९ एफ ४२९९)मधून शनिवारी १७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुरांची निर्दयीपणे वाहतूक करत असतांना चाळीसगाव पोलीसांना आढळून आला. पोलीसांनी आयशरवर कारवाई करत म्हशीचे परडे व रेडकू असे ३० जनावरांची सुटका केली आहे. जप्त केलेल्या जनावरांना गौशाळेत रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक मोबीन खान सलिम खान (वय-३२) रा. चाळीसगाव आणि शेख फिरोजोद्दिन शेख चिरागोद्दिन (वय-३६) रा. मालेगाव जि.नाशिक याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहे.

Protected Content