अज्ञात वाहनाच्या धडकेत मामा-भाचा ठार !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विवाहाची पत्रिका देऊन परतणार्‍या मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविल्यामुळे त्यांचा अंत झाल्याची करूण घटना तालुक्यात घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शिवाजी रामदास काळबहिले ( वय ५०, रा. साळशिंगी ) हे आपला भाचा ज्ञानेश्‍वर लक्ष्मण पाटील ( वय ३५ ) याच्यासह विवाहाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. जळगाव येथून परत येत असतांना बोदवड ते भुसावळच्या दरम्यान असणार्‍या करंजी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात शिवाजी काळबहिले आणि ज्ञानेश्‍वर पाटील हे गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तथापि, उपचार सुरू होण्याआधीच या दोघांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे साळशिंगी परिसरावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content