Home क्राईम एमआयडीसी पोलिसांची एकाला अमानुष मारहाण

एमआयडीसी पोलिसांची एकाला अमानुष मारहाण

0
41

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून दाखल झालेल्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहत स्थानकाच्या दोन पोलिसांना सुप्रीम कॉलनीतील एकाला अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सुप्रिम कॉलनीतील मंगल तुफानसिंग बागडे यांच्याविरुद्ध सोमवारी झालेल्या कौटुंबीक वादातून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. दरम्यान पती-पत्नीमधील वाद मिटल्यानंतर दोन पोलीस सुप्रीम कॉलनीत गेले. त्यांंनी मंगल याला घरातून बाहेर काढून बेदम मारहाण केली. यात मंगलचे तोंड फुटले. पाठीवर दंडुका मारल्याने मोठे व्रण आले. त्यानंतर मंगल व त्याची आई मारहाण करणार्‍या पोलिसाविरुद्ध तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले. परंतू पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर ते जखमी अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात आले, मात्र तेथे पोलिस अधीक्षक किंवा सहायक पोलिस अधीक्षकांची भेट झाली नाही. अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound