कोरपावली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सॅनिटायझर व मास्कचे वाटप

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयात  ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सरपंच विलास अडकमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

ध्वजारोहणप्रसंगी उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्राम पंचायत सदस्य आरीफ तडवी , सत्तार तडवी , हुर्रमत तडवी , अफरोज पटेल , सौ कविता कोळंबे , सपना जावळे, दिपक नेहते, दतु महाजन, सुनिल अडकमोल, ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते मुनाफ तडवी आदी उपस्थित होते. कोरपावली ग्रामपंचायत व क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड यावल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून सॅनिटायझर व मास्क चे वितरण सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या हस्ते  करण्यात आले.  याप्रसंगी मास्क व सॅनिटायझर  क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड यावलच्या वतीने समाधान पाटील, योगेश जगताप, मनोज कलसकर, रितेश पाचपोर हे प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, कोरपावली गावातील समाज सेवक मुक्तार पिरण पटेल, ग्रामपंचायत सदस्य आरिफ तडवी, माजी ग्राम पंचायतचे सदस्य सर्फराज तडवी, गावातील पोलीस पाटील सलीम तडवी, नागो तायडे, अभिजित अडकमोल, किसन तायडे, सलीम तडवी आदींनी उपस्थित होते. मागील २१ दिवसांपासुन ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांची रावेर येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर नव्या ग्रामसेवकाची नेमणुक होत नसल्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातुन होणारी विकासकामे पुर्णपणे ठप्प पडलेली असून, लोकप्रतिनिधींनी गावाचा कारभार कसा करावा असा प्रश्न सरपंच विलास अडकमोल यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे.

 

Protected Content