बोढरे गावात कोरोनाचा विस्फोट; रूग्णांच्या संख्येत वाढ

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बांधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज पन्नास जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात चार जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज कोव्हीड चाचणीचे आयोजन येथील ग्रामपंचायतीत सकाळी १० वाजेच्या दरम्यान करण्यात आले. त्यात एकूण पंन्नास जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यातून चार जणांना कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकूण संख्या ही ८ वर पोहोचली आहे. त्यामुळे गावाची वाटचाल हॉटस्पॉट गावाकडे होतांना दिसून येत आहे. गावात एकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ जणांमध्ये काही विलिनीकरण होऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. तर बाकीचे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहे. रॅपिड टेस्ट करतांना पंन्नासच किट असल्याने पंन्नास जणांचीच चाचणी करण्यात आली. उर्वरीत ग्रामस्थांची चाचणी करण्यात येणार असून आणखीण रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गावात भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र गावाच्या प्रमुखांसह प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळेच हि रूग्णांची संख्या वाढत असल्याची प्रतिक्रिया उमटतांना दिसून येत आहे.

 

Protected Content