पाचोऱ्यात “अॅनिमियामुक्त भारत” अभियानाचे उद्घाटन

 

पाचोरा, प्रतिनिधी ! शहरात शुक्रवारी “अॅनिमियामुक्त भारत” अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दादाभाऊ चौधरी उपस्थिती होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब मंत्रालयाने सुरू केलेल्या या अभियानाचे महत्व व उद्देश उपस्थितांना समजवून सांगितले. डॉ. सुनील गवळी यांनी अभियान कशा प्रकारे राबवावे जेणे करून रुग्ण कमी होतील या बाबत मार्गदर्शन केले.

याअभियानांतर्गत ६ महिन्याच्या बालकापासून तर ४९ वर्षांपर्यंत असलेल्या रुग्णांचे चार गट तयार केले असून यात गरोदर माता तसेच स्तनपान करणाऱ्या माता यांचाही यात समावेश असून जनतेने सहकार्य करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. यावेळी सर्व आरोग्य सेविका व आशा भगिनींची उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक दीक्षित, आकाश ठाकूर व शिवाजी चौधरी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content