यावल ग्रामीण रूग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या ५० जणांची तपासणी

यावल प्रतिनिधी । यावल ग्रामीण रूग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या ५० जणांची तपासणी करण्यात आली. यात औरंगाबाद येथून आलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीला जळगाव जिल्हा रूग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यासाठी रवाना केले आहे.

यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रभाकर पवार, डॉ.बी.बी.बारेला यांनी मंगळवारी बाहेरगावाहून आलेल्या ५० जणांची आरोग्य तपासणी केली आहे. यात एक व्यक्तीला लक्षणे आल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पसरू नये या यासाठी युद्धपातळीवर आरोग्य विभागाने दक्षता घेतली असून यातच भीतीच्या वातावरणात राहणाऱ्या नागरिकांना यावल शहरात कोरोनाचा संशयित व्यक्ती मिळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.

यावल तालुक्यातील फैजपुर शहर व आमोदा येथेही प्रत्येकी एक व्यक्तींची कोरोना संशयित मिळाल्याने त्यांना देखील प्राथमिक तपासणी केली असता पुढील तपासणीसाठी आरोग्य पथकाद्वारे जळगाव येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्‍हाटे यांनी सांगीतले असून यावरचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

यासंदर्भात यावल तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व गटविकास अधिकारी निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एल. पवार यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने या विशेष बैठकीत उपस्थित होते. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी करोना विषाणू आजारा संदर्भातील विस्तृत आढावा घेतला. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी यावरचे निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content