केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

 

जळगाव, प्रतिनधी । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ म्हणून आजपर्यत १३५ कोरोना पेशंट आज तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे  यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन स्वगृही परतले आहेत.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि ११ मार्च २०२१ पासून स्वतंत्र विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.  या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेण्यात येते सोबतच योगासन, विविध प्रकारचे खेळ घेण्यात येतात. आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी  अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन रूग्णांसोबत संवाद साधत आहेत.

ऑक्सिजन बेडची व्यवस्था उपलब्ध 

कोरोना रूग्णाची वाढती संख्या व रुग्णाच्या नातेवाईकांची ऑक्सिजन बेडसाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन स्वतंत्र २० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी २४ तास तज्ञ डॉक्टरांची सेवा, प्रशिक्षित वार्ड बॉय व नर्स उपलब्ध आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना शुल्कात विशेष सवलत असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, प्रकल्प प्रमुख सतिश मोरे यांनी दिली आहे.

 

 

Protected Content