मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबीर 

 

जळगाव, प्रतिनिधी ।येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी.  युवाकुमार रेड्डी, रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकरलाल सोनवणे, डॉ. डी. आर. क्षीरसागर,  राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. रेखा अहुजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, प्रा. अमिता वराडे, रक्तपेढीचे टेक्निशियन सीमा शिंदे, उमाकांत शिंपी, अन्वर खान उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, रक्तदान हेच श्रेष्ठदान असून त्यामुळे एखाद्यास जीवदान देता येते. काही गंभीररीत्या आजारी असलेल्या पेशंटला रक्त दिल्याशिवाय उपचार करता येत नाही. तेव्हा रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  प्राचार्य डॉ. रेड्डी  यांनी देशभर निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा अधोरेखित करत रक्तदानाचे महत्त्व विशद करून रक्तदानाचे आरोग्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात होणारे लाभ स्पष्ट केले. मयूर माळी या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाहुजा यांनी प्रास्ताविक केले तर गणेश चौधरी यांनी मानले.

Protected Content