भुसावळात दीनदयाळ नगर वस्ती हटवली : मोबदल्यासाठी रहिवाशी संतप्त (व्हिडीओ)

bhusaval karvai

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील दीनदयाळ नगर भागात आज (दि.१६) शासनातर्फे मोठ्या पोलीस बंदोबस्तात महामार्गासाठी जागा अधिग्रहण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान येथील रहिवाशांना पुरेशी नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यासाठी शासनाशी लढा देत राहणार असल्याचा इशारा तेथील रहिवाशांनी दिला आहे.

अधिक माहिती अशी की, महामार्ग प्रशासन विभागाने १९६६ सालापासून असलेली ही वस्ती आज हटवली आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यापैकी काही लोकांना त्याबद्दल भरपाई मिळाली आहे. काही अद्याप वंचित आहेत तर काहींना मिळालेली भरपाई अपूर्ण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सगळ्यांना संपूर्ण भरपाई मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा येथील जयप्रकाश नारायण बहुउद्देशीय संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी ते न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार आहेत.

Protected Content