लाचखोर तलाठ्यासह कोतवालास रंगेहात पकडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मयत भावाच्या शेतीवर भावाच्या पत्नीचे व मुलांचे नाव लावण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना रावेर तालुक्यातील खिरोदा गावात घडली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशीकी, तक्रारदार हे रावेर तालुक्यातील खिरोदा येथील रहिवाशी आहे. त्याच्या वडीलोपार्जीत शेती ही दोन्ही भावांच्या नावावर आहे. दरम्यान, तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेली शेती भावाची पत्नी व मुलगा यांनी वारस लावण्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय-४५) रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता.यावल जि.जळगाव आणि कोतवाल शांताराम यादव कोळी (वय-५२) रा. रावेर यांनी चार हजाराची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.त्यानुसार विभागाने गुरूवार ६ एप्रिलरोजी दुपारी सापळा रचून पंचांसमक्ष तलाठी प्रमोद न्यायदे यांनी कोतवाल शांताराम कोळी यांच्या समोर ४ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच जळगाव लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरण सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एस.के. बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर याच्यासह आदींनी कारवाई केली.

Protected Content