गिरणा नदीपत्रात बुडालेल्या ‘त्या’ वृध्दाची ओळख पटली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात अनोळखी ६२ वर्षीय वृध्दाचा मृतदेह बुधवारी ५ एप्रील रोजी सकाळी आढळून आला होता. नातेवाईकांनी मयताची ओळख पटविली आहे. याप्रकरणी गुरूवार ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष धना कोळी (वय-६२) रा. पाळधी खुर्द ता.धरणगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सुभाष कोळी हे आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत वास्तव्याला होते. ओला चारा शेतातून आणून बाजारात विक्री करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते शेतात चारा घेण्यासाठी निघून गेले. सायंकाळपर्यंत ते घरी आले नाही. त्याच्या तीनही मुलांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील निमखेडी तालुक्यातील गावानजीक त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. हातात सुभाष नाव गोंदलेले असल्याने सायंकाळी ६ वाजता नातेवाईकांनी मयत हे सुभाष कोळी असल्याचे ओळख पटविली. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी सखुबाई, तीन मुले गणेश, समाधान आणि सुनिल आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Protected Content