पंतप्रधान मोदींमुळे पोस्टर बॉय झालोय : विजय मल्ल्या


vijay mallya
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे भारतात माझी पोस्टर बॉयसारखी प्रतिमानिर्मिती झाल्याचे वक्तव्य मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केले आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी मोदी यांनी मल्ल्याकडून त्याच्या कर्जापेक्षा बँकांनी अधिक वसूली केल्याचे म्हटले होते. याविषयी मल्ल्याने ट्विटरवरून नाराजी व्यक्ती केली आहे.

 

मल्ल्याने ट्विटरवर म्हटले आहे की, मी १९९२ पासूनच ब्रिटनचा नागरिक आहे. मग भाजपचे नेते मी भारतातून पळून गेलो, असे का सांगत फिरतायेत, हा सवाल मल्ल्याने उपस्थित केला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीचाही दाखला दिला. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी माझे नाव घेतले होते. मी बँकांकडून ९ हजार कोटींचे कर्ज घेतले. परंतु बँकांनी माझी १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. मग तरीही भाजपचे नेते माझ्याविरोधात भाषणबाजी का करतात?, असेही मल्ल्याने विचारले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here