Home क्राईम गुरूनानक नगरातील माहेरवाशीणीचा मोटारसायकल घेण्यासाठी छळ

गुरूनानक नगरातील माहेरवाशीणीचा मोटारसायकल घेण्यासाठी छळ

0
109
mahila


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठजवळील गुरुनानक नगर येथील माहेरवाशीणीला माहेरहुन मोटारसायकल घेण्यासाठी पैसे आणावे यासाठी छळ करणाऱ्या अमळनेर येथील पतीसह सासु सासऱ्यांवर शनीपेठ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दिलेल्या तक्रारीनुसार,  भारती विजय लोट(वय-२५) रा. मेहतर कॉलनी, अमळनेर ह.मु. गुरूनानक, शनीपेठ यांचा विवाह अमळनेर येथील विजय सुरेश लोटे यांच्याशी झाला आहे.  माहेरुन मोटासायकल घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून पती विजय लोटे यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला, तसेच, सासरच्या मंडळींकडून त्यांना मारहाणीस प्रोत्साहीत करुन टोमणे मारण्यात येत होते. सतत होणारी मारहाण असह्य झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथे निघून आल्या. विवाहिता भारती यांच्या तक्रारीवरुन पती विजय लोटे, सासू-मंगलाबाई सुरेश लोटे आणि सासरे-सुरेश लोटे यांच्या विरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक रविंद्र पाटिल करीत आहेत.

 


Protected Content

Play sound