सिंधी कॉलनीत तीन लाखांचा गुटखा पकडला; पती-पत्नीला अटक, मुलगा फरार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंवर नगर आणि तांबापूर परिसरात बेकायदेशीर गुटखा व सुगंधीत पान मसाला विक्री करणाऱ्या एकाच मालकाच्या दोन दुकान व घरावर अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथक आणि एमआयडीसी पोलीसात आज दुपारी छापा टाकू सुमारे २ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून एक फरार झाला. याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर आणि तांबापुर परिसरात बेकायदेशील मोठ्याप्रमाणावर सुगंधित पान मसाल्याची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. सहाय्यक पोलीस अधिक्षक चिंथा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून तीन पथक तयार केले. दुपारी १२.३० ते ४.३० वाजेदरम्यान शहरातील रमेश जेठानंद चेतवाणी रा. सिंधी कॉलनी यांच्या मालकीच्या खुशी ट्रेडर्स नावाच्या दोन दुकानांवर आणि राहत्या घरात तीन्ही पथकांनी अचानक छापा टाकला. यात तिन्ही ठिकाणी छापा टाकून सुमारे २ लाख ९८ हजार ६३६ रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत पान मसाला हस्तगत करण्यात आला. ही तिन्ही दुकाने एकाच मालकिचे असून याप्रकरणी दुकानमालक रमेश जेठानंद चेतवाणी आणि सिमरन(नाव बदललेले) रमेश चेतवाणी रा. सिंधी कॉलनी या पती-पत्नी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून मुलगा दिपक रमेश चेतवाणी हा फरार झाला  आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार तुकाराम निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविंद्र मोतीराया, प्रकाश कोकाटे, निलेश पाटील, कैलास सोनवणे, विजय काळे, महिला पो.कॉ. उषा तिवाणे, वैशाली सोनवणे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, पो.ना. सुनिल सोनार, पो.ना. मिलींद सोनवणे., पो.कॉ. सुधीर सावळे, पो.कॉ. सचिन पाटील, महिला पोलीस कॉ. सपना येरगुंटला, महिला पो.कॉ. जयश्री बाविस्कर यांनी ही कारवाई केली.

Protected Content