कंत्राटी सफाई कामगारांना विविध सुविधा देण्याची मागणी

WhatsApp Image 2019 11 20 at 20.13.49

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला शहरातील सफाई कामाचा ठेका देण्यात आला आहे. कंत्राटी सफाई कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होवुन त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरूण चांगरे यांनी मनपा प्रशासन व शासनाकडे तक्रार केली होती. यापार्श्वभूमीवर नुकतीच उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतननुसार किमान वेतन व विशेष भत्तासह पगार चेकद्वारा देण्यात यावे. कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानसार साप्ताहिक पगारी सटी देण्यात यावी. कंत्राटी सफाई कामगाराच इ.पा.एफ. व विम्याचा रक्कम मक्तेदाराकडून वसूल करून करण्यात यावा व भरलेल्या चलनाची प्रत जोडल्याशिवाय पुढचे वेतन देण्यात येवु नये आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच कंत्राटी सफाई कामगारांना नियमानुसार गणवेश, मास्क, हॅण्डग्लोज, गमबुट, ओळखपत्र, साफसफाईसाठी लागणारे आवश्यक साहित्य कंत्राटदाराकडून उपलब्ध करून देण्यात यावे. कंत्राटी सफाई कामगारांचे ई.पी.एफ. व विम्याचे नोंदणी कार्ड कामगारांना देण्यात  यावे. महापालिकेच्या मार्फत शासनाचे किमान वेतन व विशेष भत्त्यासह सफाई कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात यावी. शासन परिपत्रकानुसार साफसफाईचे काम मेहतर वाल्मीकी समाजाच्या संस्थांना प्राधान्याने देण्यात यावे. तसेच संघटनेने वेळोवेळी या संदर्भात दिलेल्या निवेदनानुसार कारवाई करण्यात यावी आदी विषयांवर चर्चा होवुन कार्यवाही करण्याचे उपायुक्तांनी सांगितले व प्रोसिडींग
लिहून घेण्यात आले. या बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील, प्रदेश अध्यक्ष अरूण चांगरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे, दयाराम कसोटे, जयप्रकाश चांगरे, राकेश सनकत, जितेंद्र चांगरे, सामाजिक कार्यकर्ते अरूणबाबुजी चांगरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content