डी-मार्टला ५० हजारांचा दंड; आज दाखल होणार गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कोरोबाबतच्या नियमांचा भंग केल्यामुळे डी-मार्ट मॉलला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून आज संचालकांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच यासाठी सुधारित नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतांनाही डी-मार्टमध्ये प्रचंड गर्दी आढळून आली होती. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठोकले होते. याप्रकरणी पालिकेने डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच आज डी-मार्ट मॉलच्या संचालकांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली आहे.

Protected Content