पालकमंत्र्यांनी कोविडग्रस्तांशी साधला संवाद ( Video )

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी कोरोना वॉर्डात जाऊन रूग्णांशी संवाद साधला.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रूग्ण कोरोना मुक्त होण्याचेही प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय हे कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. हे रूग्णालय अधिग्रहीत केल्यानंतर याठिकाणी कोरोना बाधित रूग्णांवर उपचार केले जात आहे. सद्यस्थितीला डॉ.उल्हास पाटील कोविड सेंटरमध्ये २३५ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.

पालकमंत्र्यांकडून समाधान व्यक्त

कोरोनाचे संकट आल्यापासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे पायाला भिंगरी लावून जिल्हाभर फिरत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कोविड सेंटरला त्यांनी भेट देऊन रूग्ण सुविधांचा आढावा घेत प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज डॉ.उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रविण कोल्हे यांनी रूग्णांविषयीची माहिती दिली. तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रय्या कांते, मेडीसीन तज्ञ डॉ.पाराजी बाचेवार, नर्सिंगचे मेट्रन संकेत पाटील, शिवानंद बिरादार यांनी रूग्णांना देण्यात येणार्‍या उपचारा विषयीची माहिती पालकमंत्री ना. पाटील यांना दिली.

रूग्णांशी साधला संवाद

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केवळ बाहेरूनच पाहणी न करता थेट कोरोना वॉर्डात जाऊन बाधित रूग्णांशी संवाद साधला. स्वच्छता, जेवण, उपचार या सुविधांविषयी ना. पाटील यांनी रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. रूग्णांनीही डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले.

टाळ्या वाजवून रूग्णालयाचे मानले आभार

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोना वॉर्डात बाधित रूग्णांशी संवाद साधल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर सर्व रूग्णांनी टाळ्या वाजवुन डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, यासारख्या कोरोना योध्दांविषयी ऋण व्यक्त केले. रूग्णांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत धनंजय सोनवणे, माजी जि.प.सदस्य विश्‍वनाथ पाटील उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/477678589763101

Protected Content