डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावरील अत्याचाराचा जागरूक मुस्लिम मंचतर्फे निषेध

WhatsApp Image 2019 11 30 at 18.21.49

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील जागरूक मुस्लिम मंचतर्फे शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री तेलंगणा राज्य तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्यामार्फत निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

निवेदनाचा आशय : डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर पाशवी अत्याचार करून त्यांच्या निर्घुण हत्याकंडास जबाबदार असणाऱ्यांना नराधमांना तात्काळ कठोर शासन करावे, घटनास्थळावर जाण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी. समाजात कायदा व सुव्यवस्थेबाबत समाजकंटकांना दहशत वाटावी व सर्वसामान्यांना विश्वास निर्माण व्हावा म्हणून सदर प्रकरण अतिजलद न्यायालयात निवाडा करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. देशभरातील महिलांमध्ये सुरक्षेतिची भावना निर्माण होण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तत्पूर्वी मुस्लिम समाजाच्यावतीने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी कुल जमातीचे सय्यद चाँद व बशीर बुरहानी, मनियार बिरादरीचे फारुक शेख, ईदगाह ट्रस्टचे अनीस शाह व ताहेर शेख, काँग्रेस पक्षाचे अमजद खान, बाबा देशमुख व जमील शेख, मीज़ान फॉउंडेशनचे कासिम उमर, जामा मशीदचे अल्ताफ शेख व रउफ टेलर, फुले मार्केट हॉकर्स समितीचे फारुख अहेलेकार, शिरसोली शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य शेख अकील, आदींचा समावेश होता.

Protected Content