Home धर्म-समाज यावल येथे पैगंबर मोहम्मंद यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे जुलूस उत्साहात

यावल येथे पैगंबर मोहम्मंद यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे जुलूस उत्साहात

0
85


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने ईदमिलाद-उन-नबी हा सण मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आले.

यावल शहरातुन प्रमुख मार्गाने काढण्यात आलेल्या जुलुस (मिरवणुकीने) हजारो मुस्लिम बांधवांनी आकर्षक वस्त्र परिधान करीत सर्वांचे लक्ष वेधले.

“ईद मिलाद उन नबी” या दिवशी ईस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणी महान संदेष्टे पैगंबर हजरत मोहम्मंद यांचा जन्म मुस्लिम धर्मियांचे पवित्र मानले जाणारे स्थळ मक्का येथे रबी उल अव्वलच्या १२ दिवशी झाला होता. अशी ईस्लाम धर्मात मान्यता असल्याने आज २९ सप्टेबर रोजी यावल शहरात ईद मिलाद उन नबी हा सण मोठया उत्साहाने मुस्लीम बांधवांच्या वतीने साजरे करण्यात आला.

शहरातील बुरूज चौक पासुन ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीस प्रारंभ झाले. मिरवणुक नगीना चौक, बाबुजीपुरा,पागा परिसर,सुदर्शन चित्र मंदीर परिसराच्या मार्गाने शहरातील प्रसिद्ध खाव्वाजा मस्जिद येथे सामुहिक नमाज पठणानंतर या मिरवणुकीचे समारोप झाले. यावेळी मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांसाठी युवकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

या मिरवणुकीत फैजपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद कुमार गोसावी, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,  पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याकामी आपला बंदोबस्त चोख ठेवला.

यावल शहरात आज ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने विविध ठीकाणी तरूण मुस्लीम युवकांच्या वतीने गोड प्रसाद (लंगर) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound