मारहाण आणि धमकीच्या भीतीने तरुणाने केलं असं काही; परिसरात हळहळ

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरूणास दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिल्याने युवकाने घाबरून जाऊन यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे (वय-२३), या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील २ महिलासह भास्कर आनंदा जंगले, भूषण भास्कर जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी गावात संतोष किनगे यास त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत तु गावातून निघून जा अशी धमकी दिली.

युवकाने घाबरून जात यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांचे गट नंबर ५५७ चे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रथम गुरुवारी दुपारी चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांचे खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर सायंकाळी उशिरा मयताचे वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दोन महिलासह पाच संशयीता विरुद्ध तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे घटनेचा तपास पुढील तपास करीत आहेत.

Protected Content