श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदीर’ व्हावे ! – महंत जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर प्रतिनिधी ।  मानवाला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी यासह सृष्टीतील सर्व घटक आपल्याला विनामोबदला मिळत असते व त्याचा आपण उपभोग घेतो. या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपणही देवाच्या कार्यासाठी आपल्या यथाशक्ती प्रमाणे हातभार लावावा. जेणेकरून आपल्या सर्वांच्या समर्पित सेवेतून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन ते मंदीर निश्चितच   ‘राष्ट्रमंदिर ‘होईल] असे भावनिक प्रतिपादन महामंडलेश्वर महंत स्वामी श्रीजनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी भव्य मंदिर निर्माण निधी समर्पण अभियाना अंतर्गत साकळी ता.यावल येथे ११ रोजी श्री भवानी माता मंदीर मंगल कार्यालयात साकळी मंडळाच्यावतीने ‘संत-महंत आशिर्वचन- मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महामंडलेश्वर महंत स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर सावदा येथील गुरुकुल चे प.पू. स्वामी भक्तीकिशोरदासजी शास्त्री महाराज, ह.भ.प.अंकुश महाराज (मनवेलकर), विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू आण्णा माळी,निधी समर्पण समितीचे यावल तालुकाप्रमुख गणेश सूर्यवंशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत हरी तायडे(साकळी) हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित संत- महंतांचे गावातून  वाजत- गाजत, फुलांचा वर्षाव करीत व जयघोष करीत स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमस्थळी महिला सुवासिनींनी महाराजांना औक्षण करून पारंपरिक हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी गावात अतिशय मंगलमय व धार्मिक असे वातावरण निर्माण झालेले होते. सारा परिसर हा श्रीराममय बनलेला होता.यानंतर उपस्थित संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते श्रीराम, भारतमाता यांच्या प्रतिमेचे तसेच श्रीरामसेतुशिला,श्रीरामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती यांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

महंत जनार्दन हरीजी महाराज मार्गदर्शनात शेवटी म्हणाले की, आपल्या परिसरात सदैव सुख- शांती नांदावी यासाठी एकमेकांशी प्रेमाने रहा, संघटित रहा, मजबूत राहा.आपल्या प्रत्येक सुख- दुःखात आम्ही सर्व संत समाज आपल्या पाठीशी आहोत. परिसराच्या विकासासाठी काही अडचणी असतील तर सोडविण्यासाठी सुद्धा आम्ही आपल्या सोबत आहोत.परिसरात मानवी एकात्मता निर्माण करुन परिसराची खूप चांगल्या प्रकारे प्रगती करा. तुमच्या मनात देव, देश,धर्माबद्दल जी श्रद्धा आहे याच दर्शन आम्हा संतमंडळींना येथे घडलं आहे.तेव्हा आपल्या मंडळात व्यवस्थित रचना लावून निधी समर्पण अभियान यशस्वी करा.यावेळी गावातून ज्या रामभक्तांनी १९९२च्या कारसेवेत सक्रीय सहभाग घेतला होता त्यांचीही आठवण करण्यात आली .

Protected Content