रेशन धान्य वाटप न करणाऱ्या दुकानदाराला सोडणार नाही – तहसीलदार जितेंद्र कुंवर

यावल प्रतिनिधी । संचारबंदी काळात नागरीकांना मदत करा, शासकिय नियम छाब्यावर ठेवणाऱ्यांना माफ करणार नाही, तसेच रेशन धान्य वाटप न करणाऱ्यांवर कठोर करवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकानदार यांच्या शिष्टमंडळाशी बोलतांना सांगितले.

यावल तालुक्यातील भालोद आणि अकलूद या गावातील दोन स्वस्त धान्य दुकानदारांवर काल ११ एप्रिल रोजी ग्राहकांना वाटपासाठी दिलेल्या स्वस्त धान्य वितरणाच्या कामात गोंधळ झाल्याचे आढळून आले आहे. राजू कोळी अकलूज व बळीराम चौधरी या दोघेही स्वस्त धान्य दुकानदारांच्या त्यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत फैजपुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर आज यावल तालुक्यातील सुमारे १२४ स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन ग्रामीण भागात स्वस्त धान्य वितरण करताना येणारे आपल्या अडीअडचणी मांडले. याप्रसंगी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यात आपण स्वस्त धान्य वितरण करताना आपल्या कार्यात पारदर्शकता आणावी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योगिता धान्य पोहोचता करावा. यापुढे स्वस्त धान्य दुकानदार यांच्याविरुद्ध येणाऱ्या तक्रारींची शहनिशा केल्याशिवाय पुढील कारवाई होणार नाही, असेही यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी स्वस्त धान्य दुकानदारांची बोलताना सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, निवासी तहसीलदार एम.एम.तडवी, नायब तहसीलदार आर.डी. पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content