तुळशीच्या पानावर अवतरले विठुराया !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्त मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी तुळशीच्या पानावर सुरेख चित्र रेखाटले. मानव सेवा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी चक्क पिंपळाच्या पानावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे चित्र रेखाटले आहे.

एक इंचाचा तुळशीच्या पानावर ऍक्रेलिक रंगाच्या वापर केला आहे. पेन्सिल रबर न वापरता ब्रस च्या साह्याने फक्त पंधरा मिनिटांमध्ये चित्र साकारलेले आहे. याआधीही जगातील पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व वर्ल्ड रेकॉर्ड लंडनमध्ये या भाकरीच्या पेंटिंगची नोंद झाली आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही केलेले आहे. तव्यावरची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र व काढलेले आहे. नवरात्र मध्ये चक्क सुपारी नऊ दिवसाचे ९ देवी रेखाटलेले आहे असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनील दाभाडे यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेलेले आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर एस डाकलिया, मानस सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी चित्रकार सुनिल दाभाडे सरांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content