दोन दुकान फोडून १४ लाख ५९ हजारांचे किमतीचे सोन्याचे मटेरियल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मारुतीपेठ मधील अलंकार ज्वेलर्स आणि त्याच्याच बाजूला असलेले नूर पॉलिश सेंटर नावाच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ड्रावर मधून १४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे २५१ ग्राम सोन्याचे मटेरियल चोरून नेल्याची घटना शुक्रवार २६ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सचिन प्रकाश सोनार (वय-३८) रा.रामपेठ जळगाव हे आपलं कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचे मारुतीपेठ येथे अलंकार नावाचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. त्याच बाजूला नूर पॉलिश सेंटर नावाचे देखील पॉलिश मारण्याचे दुकान आहे. शुक्रवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानातून एकूण १४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे २५१ ग्रॅम सोन्याचे मटेरियल चोरून नेला. हा प्रकार पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दरम्यान सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.

Protected Content