दुचाकीच्या धडकेत चिमुकली जखमी; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर परिसरात रेल्वे स्टेशननजीक रस्त्याने वडिलांसोबत पायी जात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सलीम सय्यद रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर कुटुंबासह राहतात. भीक मागून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मंगळवारी सलीम सय्यद हे त्यांची मुलगी सकिना हिला  सोबत घेत  शिवाजीनगर परिसरातील रेल्वे स्टेशनच्या  बाजुने रस्त्याने पायी जात होते यादरम्यान सद्दाम पटेल यांच्या पानटपरी नजीक अज्ञात दुचाकीस्वाराने सकिनाला धडक दिली. या धडकेत सकिनाच्या डाव्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर सकीनाच्या वडील सलीम सय्यद यांनी गुरूवारी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहेत.

Protected Content