इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Protected Content