राजू साळी यांच्या कुंचल्यातून साकारले देवरूपी पांडव योद्धे

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवरूपी डॉक्टर, नर्स, पोलिस, वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी.हे सर्व महाभारतातील पांडव योद्धा प्रमाणे लढा देत आहेत. या देवरूपी पांडवांचा एकच उद्देश कोरोनाचा नायनाट करणे, त्यास हरविणे अशी पांडवांची संकल्पना एस.बी.चौधरी,हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने कुंचल्याद्वारे उतरविले आहे.

राजू साळी यांनी कलर माध्यमातून 34×24 इंच आकारात पेंटिंग तयार केली आहे. या पेंटिंगमध्ये “डॉक्टर, नर्स,पोलिस वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी यह ‘महाभारत के पांडव योद्धा कोरोना को हरायेगे और भारत को जितायेगे”! या घोषवाक्य द्वारे आकाशातून पांडव पृथ्वीवर कोरोनाला हरविण्यासाठी येत आहेत. पांडवांच्या हातात शस्त्रे दाखवण्यात आली आहे,विशेषतः भारताचा झेंडा विजयी होऊन आकाशात दाखवला आहे. राजू साळी यांनी पेंटिंगमध्ये वातावरण निर्मितीचा भास दाखवण्याचा प्रयत्न केलेला असून पेंटिंग बघितल्यावर खरोखरच आकाशातून देवरूपी पांडव पृथ्वीवर येत आहेत. आतापर्यंत साळी यांनी कोरोना विषयावर जनजागृतीवर जास्त भर दिलेला आहे.जास्तीत जास्त लोकांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा, स्वतःची व परिवाराची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पालन करा,हाच त्यांचा जनजागृतीचा उद्धेश.

Protected Content