नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आवाहन

बुलडाणा प्रतिनिधी । मान्सूनपूर्व पाऊस हा सोसाटयाच्या वाऱ्यासह तसेच विजेच्या गडगडाटासह पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थि‍तीत  मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरु असून शेतकरी /शेतमजुर बांधवांनी याबाबत विशेष सतर्क राहावे. या कालावधीत विज पडण्याचे प्रमाण जास्त दिसुन येते. त्याकरीता जीवीतहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

गडगडाटी वातावरणात वीजा चमकत असताना काय करावे व काय करु नये : सतर्कतेची चिन्हे/ चेतावणी चिन्हे –  अतिवेगाने वारे,अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना. 

वस्तुस्थ‍ि‍ती : वीज ही सामान्यपणे उंच वस्तुवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्ष‍ि‍त नाही. परंतु काही स्थान इतर ठि‍काणापेक्षा सुरक्षित असतात. मोठी बांधकामे छोटया किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षि‍त असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यु पावतात.

वज्राघात होत असताना काय करावे – आपल्या भागातील स्थानिक हवामान विषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरिक्षण करावे. स्वत:साठी  व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थि‍तीत वैद्यकीय सेवेसंदर्भात व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशिल तयार करावे. जर गडगडाटी वादळाचा /अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रि‍या पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवण्यात यावे. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या तोडुन टाकणे. परिसरात वादळी वारे गडगडाटी  वारे/ विजा चमकत असताना  व घराबाहेर असल्यास  घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. घरा भोवतालची उंच झाडे कुंपन यापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनीटे घराच्या आतच राहावे.

घराबाहेर असल्यास त्वरीत सुरक्षि‍त निवाऱ्याच्या ‍ठिकाणाकडे प्रस्थान करावे. शेतीची अवजारे , मोटार सायकल, व इतर वाहनां पासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्ष‍ि‍त स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा व गाडी सुरक्षि‍त ठिकाणी लावतांना मोठया झाडापासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणुन लगेच गुडघ्यावर बसुन हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ठेवावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क  असावा.  मोकळया तसेच लटकत्या विद्युत तारांपासुन दूर राहा. जंगलामध्ये दाट लहान झाडांखाली ,उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा.

वीज पडल्यास /वज्राघात झाल्यास त्वरीत रूग्णवाहीका व वैद्यकीय मदत बोलवा, वज्राघात बाधीत व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवुन द्यावी, त्याला हात लावण्यास धोका नाही. श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरूत्थान प्रक्रीया (mouth to mouth) राबवावी.  ह्रदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची ह्दय गती CPRचा वापर करुन सूरू ठेवावी.

काय करु नये-  गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर ,टेकडीवर, मोकळया जागांवर,स्वतंत्र झाडे,रेल्वे, बस सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टावर्स, दिव्याचे खांब, धातुचे कुंपण,उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास वायरव्दारे जोडले गेलेले फोन /मोबाईल व इतर इलेक्ट्रि‍क /इलेक्ट्रीकल उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये.

गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका. गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विज  चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका. या दरम्यान आंघोळ करणे,हात  धुणे, भांडी धुणे,कपडे  धुणे हे कार्य करु नये. प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा.(धातुची तारे,खिडक्यांची तावदाने, वायरींग,व प्लंबींग/नळ) घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असतांना किंवा वादळाव्दारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु  नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  वायर पासुन लांब रहा. विजा चमकत असतांना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी. जनावरांना सुरक्षि‍त स्थळी ठेवावे. घराबाहेर असतांना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाजवळ  उभे राहु नये. सुरक्षि‍त स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन  विभाग, जिल्हाधिकारी  कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये  केले आहे.

 

 

Protected Content