रावेर शहरात सॅनिटायझरसाठी ग्राहकांची भटकंती

 

रावेर, प्रतिनिधी। रावेर शहरातील सर्व मेडिकल्स मधील सॅनिटायझर’चा स्टॉक संपला असून प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सॅनिटायझर साठी ग्राहकांची भटकंती होत आहे. मात्र, कोणत्याच मेडिकलमध्ये सॅनिटायझर उपलबद्ध नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागत आहे.

कोरोना व्हायरसपासुन बचावासाठी हात स्वच्छ धुण्यासाठी लागणारे सॅनिटायझर’चा मेडिकल्स वरील स्टॉक जवळ-जवळ तीन दिवसांन पासुन संपला आहे. ग्राहक सॅनिटायझर आहे का.. सॅनिटायझर याचा शोध घेत आहे. येथील मेडिकल्सवर काम करणारे जितेंद्र महाजन सांगतात की, मागील तीन-चार दिवसांपासुन आमच्या मेडिकल्सवरील सॅनिटायझरचा सर्व स्टॉक संपला असून दरोरोज दिवसभरात तीस ते चाळीस ग्राहक या सॅनिटायझर घेण्यासाठी येताय. परंतु, आमच्याकडे सॅनिटायझर उपलब्ध नाही. आम्ही देखिल कंपनीकडे जास्त प्रमाणात मागणी केली आहे. त्यामुळे सद्या रावेरच्या मेडिकल्सवर सॅनिटायझर..आहे.. का.. सॅनिटायझर याचा ग्राहक शोध घेत आहे.

Protected Content