कोरोना : फैजपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना औषधाचे वाटप

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी सावद्यातील आधार आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने फैजपूर पालिकेतील १७० जणांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.

कोरोनाबाधितांचे रूग्ण जिल्ह्यासह फैजपूर शहरापर्यंत येऊन ठेवलेले आहे. कोराना विषाणू पॅनडेमिकमध्ये आयुष मंत्रालयाने बचावात्मक उपाययोजना म्हणून निर्देशित केलेल्या औषधाचा नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, पदाधिकारी, सफाई कामगार सोबत ठेक्याचे बाह्य कर्मचारी असे एकूण १७० लोकांना त्यांचे परिवारास सावदा येथील आधार आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत भागवत पाटील यांच्यावतीने मोफत वितरण केले आहे. सदरच्या औषधाने महिनाभरासाठी रोगप्रतिकार शक्ती तयार होते, असे जरी असले तरी नागरिकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियमांचे पालन करावे, असे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले..

याप्रसंगी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, रवींद्र होले, नगरसेवक कलीम मन्यार, शेख कुर्बान, देवा साळी, रईस मोमीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Protected Content