महसूल पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार; शिधापत्रिका लाभार्थ्यांना अपुर्ण धान्य वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात महसुलच्या धान्य पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अंतोदय, बीपीएल पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मिळणारे पुर्ण धान्याचा पुरवठा होत नसुन शासकीय धान्य गोदामातुन धान्य चोरटया मार्गाने अवैधरित्या काळ्या बाजारात विक्री साठी पाठवण्यात येत असल्याची तक्रार निवेदनाव्दारे महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना करण्यात आली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, यावल महसुल प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातुन पुर्णपणे धान्य वितरण करण्यात येत नसुन, लाभार्थ्यांमध्ये अपुर्ण धान्य मिळत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पुरवठा विभागाच्या माध्यमातून यावलच्या धान्य गोदामातुन अवैधरित्या छुप्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी ट्रक च्या ट्रक भरून पाठविण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय विविध शिधा पत्रिकांवर १२ अंकी क्रमांकाचे गोंधळ नेमके काय आहे . या सर्व विषयाचे स्पष्टीकरण देत या कारभाराची चौकशी करून महसूलच्या पुरवठा विभागाने १५ दिवसाच्या आत द्यावे अन्यथा संघटनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहितीच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनावर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव सुकदेव भालेराव, यावल तालुका अध्यक्ष बबीता तडवी, यावल तालुका उपाध्यक्ष प्रविण भानुदास हतकर व प्रमोद रमेश शिंदे यांच्यासह रोशन सुभान तडवी, युसुफ शहा सुपडू शहा, शेख फरीद शेख नुरूद्दीन यांच्यासह आदीच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content