Home क्राईम यावल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत रुजू

यावल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत रुजू

0
71

यावल , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे रुजु झाले असून त्यांनी शुक्रवारपासून कार्यभार हाती घेतला आहे .

 

यावल पोलीस ठाण्यात मागील तिन महीन्यांपासू न कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे (आयपीएस) यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाल संपला आहे. यामुळे त्यांनी प्रभारी अधिकारी पदाचा पदभार सोडला असून त्यांच्या रिक्त झालेल्या पोलीस निरिक्षक पदावर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भागवत यांनी यावल पोलीस स्टेशनचा कार्यभार आज शुक्रवार दि. १ जुलै रोजी पासुन घेतला आहे . पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी पदभार स्विकारल्यावर यावल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले , पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.


Protected Content

Play sound