जामनेर तालुक्यात अंगणवाडी तपासणीची “विशेष धडक मोहीम”

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पंधरवड्यात ‘अंगणवाडी तपासणी विशेष धडक मोहीम’ राबविण्यात येत आहे.

राज्यात साधारणपणे हिवाळ्यात मोठ्या संख्येने रोजगारासाठी कुटुंबे आपल्या बालकासह स्थलांतरित होतात व मे अखेरीस सर्वच मजूर आपापल्या गावी परत येतात. परिणामी स्थलांतरांतर कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होणे, बालकांची पोषण स्थिती खालावणे यामुळे अर्भक व बालमृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता शून्य ते सहा वर्षे  वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी करणे, लसीकरण प्रलंबीत असलेल्या बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करणे, किशोरवयीन मुली,गरोदर माता,स्तनदा माता यांची तपासणी करणे आणि कुपोषित व तीव्र कुपोषीत बालकांचा शोध घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने तालुक्यात दि. १ जून ते १५ जून पर्यंत विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

जामनेर तालुक्यात ३९६ अंगणवाडी केंद्रातील ३४६७३ बालकांची,२७३८६ किशोरवयीन मुली,१६८७ गरोदर माता, १४७३ स्तनदा मातांची तपासणी नेमून दिलेल्या टीमनुसार करण्यात येत आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी पदम परदेशी व महिला बालकल्याण विभागाचे सहकार्य लाभत आहे.

या तपासणीतून कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्याचे व्यवस्थापन करून सुधारणा होऊन पुढील होणारे अर्भक व बालमृत्यू टाळता येतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!