राज्याचे आर्थिक महत्वाचे स्थान ओळखून महाराष्ट्रात सरसकट कोरोना लसीकरण करा

 

मुंबई : वृत्तसंस्था । उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे  राज्याचे आर्थिक महत्वाचे स्थान ओळखून महाराष्ट्रात सरसकट कोरोना लसीकरण करा  अशी इच्छा व्यक्त केलीय.

काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख सतत चढताच असल्याने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आलीय. 

सोशल नेटवर्किंगवर सक्रीय असणाऱ्या महिंद्रा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अरोग्यमंत्र्यांना टॅग करत महाराष्ट्र हे राज्य आर्थिक दृष्ट्या अंत्यंत महत्वाचं असून सध्याची  रुग्णांची वाढ पाहता महाराष्ट्रापुरतं तरी सरसकट लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केलीय. “रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आणखीन लॉकडाउन राज्याला आर्थिक दुष्ट्या कमकुवत करणारे ठरतील. त्यामुळेच ज्यांना ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना लसीकरणाची तातडीची परवानगी देण्याची गरज महाराष्ट्रात आहे. लसींची कमतरता नाहीय,” असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि हर्षवर्धन यांना टॅग केलं आहे.

रुग्ण वाढू लागल्याने स्वयंशिस्त पाळा, अन्यथा टाळेबंदी लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिला होता. ३१ मार्चपर्यंत हे सारे निर्बंध लागू राहतील, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला गर्दी कमी करण्यावर सरकारने भर दिलाय.

सर्व कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के  उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी कार्यालये साथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येतील, असे कठोर पाऊल सरकारने उचलले आहे. सध्या खासगी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के  उपस्थिती असल्याने गर्दी वाढली आहे.

राज्यात सोमवारी १५,०५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला.   पुणे जिल्ह््यात सर्वाधिक म्हणजे २६ हजारांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.

Protected Content