कोरोनामुळे यावलचे रावणदहन यंदा रद्द

 

यावल : प्रतिनिधी । सलग २१ वर्षा पासुन सुरु असलेले विजया दशमीच्या दिवशी यावल येथे होणारे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे रावणदहणचे कार्यक्रम या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहे . प्रा. मुकेश येवले यांनी ही माहिती दिली
संपुर्ण देशामध्ये कोविड १९ कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या आजाराने सहा महीने झाले आपण संघर्ष करत आहोत कधीही बंद नसणारी रेल्वे , बस , मंदीरे , मस्जिद ,शाळा ,काॅलेज, शासकीय कार्यालय , आठवडे बाजार बंद ठेवावे लागले . या वर्षीचे दहीहंडी , गणपती , नवरात्री असे सण आपणास रद्द करावे लागले

या संघर्षांमध्ये आपण सर्वानी प्रशासनास सहकार्य केले अजुनही हे संकट टळलेले नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घेतली पाहीजे शासनांच्या नियंमांचे या देशाचा सुज्ञ व्यक्ती म्हणून काटेकोरपणे पालन करणे आपले कर्तव्य आहे .

यावल येथे प्रतिवर्ष होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्याने तुर्तास ह्या वर्षी रावण दहनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे रावण दहण समितीचा वतीने आवाहन प्रा मुकेश येवले (नगरसेवक तथा यावल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व अध्यक्ष रावण दहण समिती ) यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Protected Content