उच्चशिक्षित जोडप्याचा साखरपुड्यातच झाला आदर्श विवाह

29d35bc4 dc78 4f6f 87e0 9430b9fec173

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतही प्रचंड उधळपट्टी करून थाटामाटात विवाह होत असताना तालुक्यातील दहिवद येथील मराठा समाजातील एका उच्चशिक्षित जोडप्याचा साखरपुड्यापातच आदर्श विवाह पार पडला. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी पुढाकार घेऊन हा आदर्श विवाह घडवून आणला.

 

तालुक्यातील अंतुर्ली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका श्रीमती मंगलाबाई किशोर पाटील यांचा भाचा कै. संतोष भीमराव पाटील यांचा चिरंजीव व गणेश विष्णू पाटील यांचा पुतण्या दीपक संतोष पाटील याचा विवाह तालुक्यातील दहिवद येथील शामकांत नारायण पवार यांची सुपुत्री चि. सौ. कां. निकितासोबत निश्चित झाला होता. दीपक उच्चशिक्षित असून तो नाशिक येथे कॉन्ट्रॅक्टर आहे तर निकिता हिचे शिक्षण बीएस्सी पर्यंत झाले आहे. दोन्ही उच्चशिक्षित असल्याने त्यांच्यात हा विवाहाचा योग घडून आला आहे. यापार्श्वभूमीवर दहिवद येथे दि २२ एप्रिल रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व नातलग व समाज बांधव उपस्थित असताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी याच कार्यक्रमात विवाह उरकवून आदर्श घडवण्याची संकल्पना मांडली, यास दोन्ही बाजूच्या मंडळींनी त्वरित सहमती दर्शविली. विशेष म्हणजे शिक्षणामुळे आधुनिक विचारसरणी असलेल्या वधु-वरांनीही तयारी दाखवल्याने लागलीच विवाहाची तयारी करण्यात येऊन अतिशय साधेपणाने हा विवाह उरकण्यात आला. उदय वाघ यांनी दोन्ही कडील मंडळींचे विशेष कौतुक करून मराठा समाजाने यांचा आदर्श घेत विवाह समारंभात होणारा वायफळ खर्च, अनिष्ट रूढी व परंपरा यांना फाटा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी जि.प. सदस्य ए. टी. पाटील, गणेश पाटील, राहुल पाटील, सावन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content