कोरेगाव भीमाचा तपास केंद्राकडे देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav ayodhya

 

मुंबई (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सोमवारी दिली होती. तर तत्पूर्वी एसआयटी स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिले होते. परंतू त्यांतर कुणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने याचा तपास एनआयएकडे सोपवला. पण आज या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला करत कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही. देणार नाही, असे म्हटले आहे.

Protected Content