चाळीसगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; काँग्रेसची मागणी

WhatsApp Image 2019 11 02 at 12.41.16 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या शेतकऱ्यांना त्वरित आधार मिळावा म्हणून चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा  व शेतकऱ्यांना या ओला दुष्काळाचा निधी त्वरित मिळावा अशी मागणी चाळीसगाव तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार अमोल मोरे  यांना  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान केले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली.   याप्रसंगी अॅड. व माजी आमदार ईश्वर जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश शिंपी, नगरसेवक सुरेश शारदा चौधरी, चाळीसगाव तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, चाळीसगाव तालुका अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अल्ताफ खान तसेच चाळीसगाव शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष शोभा पवार, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

Protected Content