संत सखाराम महाराज महोत्सवात हजारो भाविक उत्साहात सहभागी

af7126f1 b152 4bbe 98ad 4631f8b86b26

अमळनेर (प्रतिनिधी) येथे मंगळवारी मतदान असूनही खानदेशातील भव्य असा संत सखाराम महाराज द्वीशताब्दी महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी धार्मिक कार्यक्रमात काकड आरती व भजन संपल्यानंतर दादा महाराज शिरवळकर यांच्या कृष्णा महाराज अरगडे व कोमलसिंग महाराज हेंदरुनकर यांच्या नेतृत्वात बोरी नदीपात्रातील गाथा मंडपात यासाठी संगीतमय गाथा पारायण करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

 

यावेळी तब्बल ३००० भाविक सहभागी झाले होते. संत सखाराम महाराज वारकरी पाठशाळा व परिसरातील नामवंत वादक, गायकांच्या सहकार्याने  संगीतमय भक्तिमय वातावरणात पारायण संपन्न झाले. त्यानंतर १०८ कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ सकाळी ७.०० वाजता सुरु झाला, यज्ञमंडपात देवता स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रधान यज्ञाचार्य खास नाशिकहून आलेले गुरुजी हेमंत धर्माधिकारी व उपयज्ञाचार्य वेदमूर्ति केशव पुराणिक यांच्या नेतृत्वात १०८ कुंडी विष्णू पंचायतन यागाचा शुभारंभ करण्यात आला. यात अग्नि नारायणाचे आवाहन करत पारंपरिक पद्धतीने अग्नि प्रज्वलित करण्यात आला. हा याग दररोज सकाळी ७.०० ते ९.०० या काळात होणार आहे. यावेळी चतुर्वेदाचे पारायणही आरंभ करण्यात आले आहे. यावेळी चार वेदशात्री चारही वेदांचे पठण करणार आहेत. त्याचबरोबर भजन गाथा पारायणही सुरू राहणार आहे. त्यानंतर अन्नदान व प्रवचन असे कार्यक्रम पार पडले, त्यात प्रथम सत्रात संत रामदास स्वामींचे वंशज गंगाधर स्वामी यांचे वंशज भूषणशास्त्री महाराज यांचे प्रवचन झाले. दुसर्‍या सत्रात इन्दौरी येथील त्रिपदी परिवाराचे प्रमुख संत श्री नाना महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. हजारो भाविकांच्या हरिपाठानंतर पंढरपूर येथील शिरवळकर फडाचे दादा महाराज शिरवळकर यांचे कीर्तन पार पडले.

यासह जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीतर्फे २५० जणांनी रक्तदान केले. दररोज रक्तदानातून रक्त संकलित करण्यात येईल. त्यात वेगवेगळ्या पतपेढी रक्तदान करणार आहेत. कांताई नेत्रपेढीतर्फे अधिक ३०० लोकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून-नेत्र तपासणी दररोज करण्यात येणार आहे. त्यात मोतीबिंदू असलेल्या ५५ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. तर दिव्यांग व्यक्तींना अंधकाठ्या, आधारकाठ्या वॊकर, कमोड खुर्च्या, व्हीलचेअर मिळून १५० वस्तु वितरित करण्यात आल्या. नदीपात्रातील  विठ्ठलमूर्ती व त्रिमूर्ती यांच्या मुर्त्या रात्रीच्या वेळी शोभा वाढवत असतात.यावेळी महाअन्नदानात १० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Add Comment

Protected Content