देवगांव देवळी येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अमळनेर येथील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान
स्वतःच्या विचारांच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर आपण आपले अस्तित्व निर्माण केले पाहीजे. हा दुर्दम्य आशावाद जिजाऊनी शिवरायांना तर दिलाच पण प्रसंगी स्वतः सुद्धा अमलात आणला. प्राणापेक्षा राष्ट्र प्रिय असेल तर तेव्हा स्वराज्य निर्माण होते. स्वामी विवेकानंद एक महान हिंदु संत होते. तरुणांचे प्रेरणास्थान होते. म्हणून त्यांचा जन्मदिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.थोर पुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे अध्यक्षीय भाषणातून स्काऊट शिक्षक एस .के. महाजन असे आवाहन केले.

व्यासपीठावर शाळेचे क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर .महाजन, स्काऊट शिक्षक एच .ओ. माळी, लिपिक एन.जी देशमुख होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आली. इयत्ता नववीतील विद्यार्थीनीं भाग्यश्री पाटील, हर्षला पाटील, गायत्री पाटील, राजश्री पाटील व स्नेहल पाटील यांनी राजमाता जिजाऊ वर उत्कृष्ट भाषण व गीत सादर केले. इयत्ता दहावीतील वैशाली पाटील या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्यावर गाण्यातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या इयत्ता नववीतील हर्षला पाटील व उत्कृष्ट गीत सादर करणाऱ्या इयत्ता दहावीतील वैशाली पाटील या विद्यार्थिनीचे शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय. आर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन एच.ओ. माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील , गुरूदास पाटील यांनी परीश्रम घेतले.

Protected Content