अमळनेर मतदार संघातील ग्रामीण रस्ते होणार प्रमुख जिल्हा मार्ग

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर मतदारसंघातील इतर जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा रस्त्यांचा दर्जा मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेचा ठरावही प्राप्त झाला. यामुळे मतदारसंघातील रस्त्यांना प्रमुख जिल्हा रस्त्यांचा दर्जा मिळाला आहे.

सदर रस्त्यावरील गावांची संख्या,लोकसंख्या,रस्त्याचा होणारा वापर याद्वारे मतदारसंघातील काही रस्ते दज्जोन्नत करण्याचा शासन निर्णय पारित झालेला आहे. यामध्ये मांडळ,जवखेडा,अनोरा, आर्डी, पिंपळे खु.,पिंपळे बु.,मंगरूळ ,शिरूड,कावपिंप्री ते प्रजिमा ४९(आंबपिंप्री फाटा) ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२९ म्हणून नव्याने मान्यता मिळाली आहे. तसेच हेडावे,रडावन, चिखलोद खु.,शेळावे खु.,शेळावे बु.,धाबे उन्नत, हिरापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १३० म्हणून नव्याने मान्यता मिळाली आह.

रस्ते विकास योजना २००१-२०२१  मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत ५०.५०० की.मी. ने वाढ झालेली आहे.यामुळे अमळनेर मतदार संघातील हे रस्ते आता जिल्हा मार्ग म्हणून ओळखले जाणार  असल्याने आता हे रस्ते दर्जेदार होणार आहेत. मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाचे स्वागत केले असून याकामी सहकार्य करणारे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण,राज्यमंत्री ना.दत्ता मामा भरणे,पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील या सर्वांचे आभार मानले आहेत.

 

Protected Content