भ्रष्टाचाराविरोधात आदिवासी एकता परिषद उपोषणाचा आज पाचवा दिवस

यावल प्रतिनिधी । एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयासमोर शासकीय मुलांचे वस्तीगृह जळगाव येथे नवीन पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवुन चर्चा केली. 

यावल येथील आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयासमोर आदीवासी एकता परिषदचे जिल्हा अध्यक्ष करण सोनवणे व त्यांचे सहकारी यशवंत अहिरे, महेन्द्र मोरे, कृष्णा मोरे यांनी शासकीय आदीवासी मुलांचे वस्तीगृह जळगाव शहर उमवि परिसर ( नविन ) येथील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्ठाचार करणाऱ्यांवर तात्काळ दोषींवर निलंबनासह कठोर कार्यवाही व्हावी या मागणी करीता दि.१३ऑगस्ट २०२१पासुन एकात्मीक आदीवासी कार्यालयासमोर आपले आमरण उपोषणा सुरू केले असुन, आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असुन , उपोषणर्कत्यांचे लक्षणीय वजन कमी झाले असुन त्यांची प्रकृती खालवली आहे. 

दरम्यान या भ्रष्ठाचाराच्या विरोधातील लढ्याला विविध पक्षांनी आपला पाठींबा दिला असुन आज यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवुन संपुर्ण विषयाची माहीती त्यांच्या कडुन जाणुन घेतली. आपला लढा हा भ्रष्ठाचाराच्या विरोधातील असुन यात शेवटी विजय हा सत्याचाच होईल असे त्यांनी उपोषणकर्ते करण सोणवणे व त्यांच्या सोबतच्या उपोषण बसलेल्या त्यांच्या सहकार्यांशी सविस्तर चर्चा केली. 

आमदार शिरीष चौधरी यांनी आदीवासी आयुक्त संदीप गोगई यांच्याशी चर्चा करून यावल येथे सुरू असलेल्या उपोषणा बाबतची माहीती दिली याबद्दल आयुक्त गोगई यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बोलतांना सांगीतले की आपण या प्रकरणाची दखल घेतली असुन समितीचा चौकशी अहवाल कार्यालयास सादर झाला असुन याचा निकाल आपण त्वरीत लावणार असुन या संदर्भातील एक लिखित पत्र आपण तात्काळ उपोषणकर्त्यांना पाठवत असल्याचे ही आयुक्तांनी आमदारांशी बोलतांना सांगीतले.

दरम्यान या उपोषणकर्त्यांबाबत भ्रष्ठाचारात सहभागी असलेले डी.बी. पाटील यांनी खुलासा करावा म्हणजे या तर चोरांच्या उलट्या बोंबा अशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल तरी देखील माझी केलेली तक्रार खोटी असेल तर पाटील यांनी आपल्या विरुद्धचे पुरावे उपोषणाच्या ठीकाणी आमच्या समोर आणावे त्याच वेळेला कुठला ही विलंब न लावता मी त्याचक्षणाला माझ्या उपोषणातुन माघार घेईल असे आवाहन  करण सोनवणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना केले आहे.

 

Protected Content