‘त्या’ बिबट्याचा वनविभागाकडून शोध सुरूच

Leop Billy

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्रीसेकमच्या शिवारातील जंगलात बिबट्या दिसुन आल्याने वनविभागाचे पथक हे काल मध्यरात्री पर्यंत हडकाई नदीच्या खोऱ्यात बिबटयाच्या शोध मार्गावर होते. मात्र तो मिळुन आला नाही अशी माहीती पुर्व विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही.एम. पाटील यांनी दिली.

याबाबतची माहीती अशी की, यावल तालुक्यातील पिंप्रीसेकम या गावातील राजेन्द्र रूपचंद कोळी यांच्या शेतात अडीच वर्ष वयाचा बिबटया गावातील एका शेतमजुरास दिसुन आल्याने पारिसरातील नागरीकांमध्ये एकच भितीचे वातावरण पसरले आहे. बिबटया दिसल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वनक्षेत्रपाल व्ही.एम पाटील यांच्या पथकाने संपुर्ण बिबव्याच्या पायाचे ठसे घेतले व काही ठीकाणांवर बिबटया शोध घेतला मात्र बिबट्या मिळुन आला नाही. काल रात्री २ वाजेपर्यंत पुन्हा या पथकाने गस्त घालुन विविध ठीकाणी बिबट्याचा शोध घेतला मात्र तो मिळुन आला नाही या संदर्भात वनविभागाने परिसरातील नागरीकांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Add Comment

Protected Content