जामनेरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवराज्याभिषेक दिन समितीतर्फे मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातून जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर शहरातील सोनबर्डीवर असलेल्या एमपी थिएटर मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा दाखवण्यात आली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमापूजन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करून मानाचा मुजरा देण्यात आला. या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला जामनेर शहरात तील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content