फैजपूर येथे संत जगन्नाथ महाराज अष्टादश पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

Faizpur 1

फैजपूर प्रतिनिधी । येथील संतपंथ मंदीर संस्थानचे ११ वे ब्रम्हलीन गादीपती संत जगन्नाथ महाराज यांचा १८ वा अष्टादश पुण्यतिथी महोत्सवात शोभायात्रा, सात संप्रदायातील संतांचे आशीर्वचन, चंद्रकांत पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार, संतपंथ दिनदर्शिका व शिक्षण संस्कार माला एकचे प्रकाशन करून समाधी स्थळ असे विविध कार्यक्रम घेत महोत्सव उत्साहात पार पडला.

आपल्या परिसराचे खरे वैभव सर्व संप्रदायात एकात्मता, समरसता आहे. सर्व संत एकत्रित येऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. ही या परिसराची विशेषता आहे. हीच एकात्मता देशाला मजबूत बनवू शकते. असे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी गुरु संत जगन्नाथ महाराज यांच्या अठराव्या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी व्यक्त केले. तसेच विलास महाराज यांना मुखी महाराज म्हणून स्वीकृती देण्यात आली. सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी निस्वार्थ सेवा देणारे एक व्यक्तीचा यावर्षी चंद्रकांत पाटील चोपडा यांना जीवनगौरव पुरस्काराने सर्व संतांकडून सन्मानित करण्यात आले.

विशेष पदाधिकारींची उपस्थिती
पुण्यतिथी महोत्सवात जळगाव येथे आमदार राजू भोळे, नगराध्यक्ष महानंदा होले, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक देवा साळी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजपा शहर अध्यक्ष संजय रल, केतन किरंगे, शेखर वानखेडे, बाजीराव धानोरा, हिरामण भिरूड, संजय महाजन चिनावल भाविक भक्तगण महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

संत व महंतांची उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाला शास्त्री भक्तिप्रकाशदासजी, स्वामीनारायण गुरुकुल सावदा, गोपाल चैतन्यजी महाराज, वृदांवन धाम, पाल, मानेकर बाबा शास्त्री दत्त मंदीर, सावदा, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, खंडेराववाडी, फैजपूर महंत, भरतदासज महाराज, श्रीराम मंदीर, कुसुंबा, स्वरूपानंद महाराज, श्रीक्षेत्र डोंगरदे, ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी, मिरा दीदी, धनराज महाराज, अंजाळेकर, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्मल चतुर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सात संप्रदायातील संतपंथ, स्वामीनारायण, वारकरी, महानुभाव, प्रजापिता ब्रम्हकुमारी, चैतन्य साधक परिवार, दत्त संप्रदाय डोंगरदे या सात संप्रदायातील संत महंत यांनी आशीर्वचन देत आपली उपस्थिती दिली.

Protected Content