लिटल व्हॅली स्कूलचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने घरूनच करताय विद्यार्जन

 

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. म्हणून केंद्र व राज्य सरकारने संचरबंदी लॉकडाऊन सुरू केल्याने सर्व शाळा , महाविद्यालय, विद्यापीठ बंद असल्याने सर्वच शैक्षणिक संस्था ओस पडल्या आहेत. येथील लिटिल व्हॅली स्कूलमद्वारे व्हाट्सअप ग्रुप व लीड ऍप च्या माध्यमातून घर बसल्या शिक्षण दिले जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, सध्या परीक्षेच्या कालावधीत लॉक डाऊन झाल्याने मुलांच्या अभ्यासावर व परीक्षांवर परिणाम होऊ नये म्हणून लिटिल व्हॅली स्कूलचे चेअरमन अशोक पाटील यांनी व्हाट्सएप गृप व लीड ऍपच्या माध्यमांच्या संपर्कातून विध्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षेचा सराव पूर्ण करून घेत आहे. लॉक डाऊन जाहीर झाल्याने दि. १६ मार्चपासून शाळा आतापर्यंत बंद आहे. याकालावधीत शिक्षक दृक्श्राव्य माध्यमातून विध्यार्थ्यांना अध्यापन व त्यांच्या शौक्षणीक शंकाचे निरसन करत आहे. शिक्षक दररोज विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास ( गृहपाठ ) देत आहेत. लीड अँपच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत विद्यार्थी घरी बसूनच आनंदाने . अध्ययन करीत आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक कोरोना विषयी पालकांमध्ये व विध्यार्थ्यांनमध्ये जनजागृती करीत आहे. या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन अशोक पाटील, मुख्याध्यापिका सारिका कासार , माधुरी चौधरी व ललित पाटील व शाळेचे शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Protected Content